पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अमोल लांडगे यांची निवड

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी येथील अमोल सर्जेराव लांडगे यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परिषदेचे अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी या निवडीचे पत्र दिले आहे.संघटना बळकट व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय,धोरणे व सामाजिक कार्याच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचा विश्वास अध्यक्ष वायदंडे यांनी व्यक्त केला आहे.