दलित महासंघाचे आटपाडी तहसीलसमोर धरणे आंदोलन

देवानंद जावीर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

दलित महासंघाने आटपाडी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.
मातंग समाजाला आरक्षण मिळावे (अनुसूचित जाती मधे अ,ब,क व ड असे विभाजन करण्यात यावे), बार्टीच्या धरतीवर आट्रीची स्थापना करण्यात यावी, शाहीररत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत सुरू करण्यात यावे, महामंडळाचे आर्थिक भागभांडवल रुपये 1 कोटी करण्यात यावे, सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळाचे कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावे, शाहीररत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना आयोगाच्या शिफारशीनुसार मान्यता देण्यात यावी, मौजे निंबवडे येथील कायदेशीर प्रस्तावानुसार मागणी असलेल्या खुल्या प्लॉटवरील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकास जागा देण्यात यावी, 4 अॉगष्ट 2018 रोजी आटपाडी शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा स्थापन करणाऱ्या मातंग समाजातील 129 कार्यकर्त्यांवरील गुन्हे दाखल केलेले फौजदारी गुन्हे मागे घेण्यात यावेत,अशा अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
मा.प्रा.डॉ.मच्छीद्र सकटे व दलीत महासंघाचे जेष्ट नेते सुरेशचंद्र भिसे,दलीत महसंघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष बळीराम रणदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, तहसील कार्यालय आटपाडी येथे निवेदन देले होते.अरुण वाघमारे,सुरज माने,रवी लांडगे,मोहन खरात उपस्थित होते.