सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कोसारी:
जत तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायत येथे 14 वा वित्त आयोग योजनेतून श्रीपाद वल्लभ सामाजिक विकास संस्थेमार्फत आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबीरामध्ये गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून गरजेनुसार औषधे मोफत वाटप करणेत आली. आलेल्या पेशेंटची सोय करणेत आली होती. सरपंच पांडुरंग खटके,उपसरपंच सौ. रत्नाबाई साळुंखे, ग्रा.पं.सदस्य कुंडलिक वाघमोडे,धनश्री सरगर,प्रकाश कांबळे,नवनाथ पवार, युवराज थोरात,सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, दिगंबर गोरे,सुकुमार सरगर उपस्थित होते.
हे आरोग्य शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग अधिकारी,कर्मचारी,आशा सेविका व ग्रा.पं. कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ग्रामसेवक बी. बी. खरमाटे यांनी आभार मानले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद