गुरुनाथ तिरपणकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मालवण:
“गाव तेथे किसान मोर्चा “ही संकल्पना घेऊन पंचक्रोशीतील शेतकरी व महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला योग्य बाजारपेठ व बाजार भाव मिळावा,शेतकरी वर्गाला चालना मिळावी,योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणुन खोटले,मालवण येथे सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ७फेब्रुवारी २०२१रोजी सकाळी १०वाजता’सुहासिनी परब हायस्कूल’येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेस भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष राजन तेली,भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी परिषदेस महिला बचत गट,शेतकरी,कृषी उद्योजक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी केले आहे.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा