लोकसहभागातून ओंकार स्वरूपातर्फे स्पर्धा परीक्षा लायब्ररीचे उद्घाटन

ग्रामीण भागातील पहिली स्पर्धा परीक्षा लायब्ररी
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्यावतीने ओंकार स्वरूपा स्पर्धा परीक्षा लायब्ररीचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जतचे तहसीलदार सचिन पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल अंकलगी उपमुख्य कार्यकारी अभियंता म्हाडा मुंबई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळाचे अध्यक्ष गणेश करे-पाटील व संतोष गोसावी मंडल अधिकारी करमाळा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी सरपंच विजयकुमार पोरे, शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे प्रमुख दऱ्याप्पा जमदाडे, ग्रा.पं. सदस्य सचिन माने ,पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी मारुती मदने, दै. पुढारी तालुका प्रतिनिधी विजय रुपनुर, येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी संस्थेचे सचिव तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, नवनाथ पवार, तुकाराम सुतार, विजय पाटील, विजय कदम, संतोष स्वामी, ॲड. सागर व्हनमाने यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेने समाजसेवेबरोबर युवा पिढी घडावी या उच्च महत्वाकांक्षेतून लोकसहभागातून ओंकार स्वरूपा स्पर्धापरीक्षा लायब्ररीची स्थापना केली आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची गोडी निर्माण व्हावे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष करून विविध शासकीय निमशासकीय सेवेमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे जावे, यासाठी ओंकार स्वरूपा फाउंडेशन संस्थेने विविध विषयाची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ग्रामीण भागात वाचन चळवळ सुरू करून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, सुजान नागरिक घडावेत, गरजू युवकांना लायब्ररीची पुस्तके देऊन युवकांना वाचनाची आवड निर्माण करणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू ठेवून युवकांचा विश्वास ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था सार्थ ठरवेल.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे म्हणाले,युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेमार्फत मोफत स्पर्धा परीक्षा लायब्ररी सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व युवकांच्या स्वप्नांना बळ दिले आहे. ही बाब या गावासाठी निश्चितच आनंददायी आणि भूषणावह असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे मत प्रशांत आवटे यांनी व्यक्त केले.
यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील म्हणाले,ही स्पर्धा परीक्षा लायब्ररी म्हणजे जुन्या नवीन विचारांची सांगड घालून देणारी आहे. ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्या कामाचे कौतुक करत संस्थेस 10,000/- रुपयांची आर्थिक स्वरुपात मदत साहाय्य केली.
या स्पर्धा परीक्षा लायब्ररीसाठी विविध भागातील विविध लोकांनी मदत केली असून त्यामुळेच खूप चांगल्याप्रकारच्या लेखकांची पुस्तके/महागडी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. युवक सक्षम व्हावा सरकारी नोकरीमध्ये युवकांचा टक्का वाढावा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके वाचावयास मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओंकार स्वरूपा संस्थेने ही लायब्ररी सुरू केल्याचे अंकलगी साहेबांनी सांगितले.