करोली(टी) येथे कोरोना जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कवठेमहांकाळ:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर प्रबोधन मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा बसला असून याच्यातून प्रत्येक व्यक्तीला झळ बसली आहे. म्हणून या कोरोनाला अटकाव घालण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. कोरोना थांबवायचा तर प्रत्येक मनुष्याने जबाबदारीने वागले पाहिजे. म्हणून माहिती व जनसंपर्क संचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय सांगली, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने “शिवा संभा वाघ्या मुरळी,गोंधळी बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या कलावंतानी करोली (टी) ग्रामपंचायतसमोर आठवडा बाजाराचे निमित्त साधून गीतांच्या माध्यमातून कोरोनाविषयावर प्रबोधन करून जनजागृती केली. या वेळेला शाहीर अवधूत पवार, सदाशिव पवार, उमेश जाधव, बाळकृष्ण पद्माळे, युवतीराज माघाडे, विठ्ठल जाधव, अंबुदास ओतारी, जयश्री कटारे, आदिती पवार, इत्यादी कलावंतांनी सहभाग घेतला.
या वेळेला प्रा.डॉ.बाळासाहेब कर्पे यांनी कार्यक्रमाच्या मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सोशल डिस्टेनसिंगचे पालन करून मास्कचा वापर गर्दीच्या ठिकाणी आवश्य केला पाहिजे. तरच कोरोनाचा अटकाव लवकरात- लवकर शक्य आहे. आपण सर्वांनी या गोष्टींचे पथ्य पाळले पाहिजे. परिणामी कोरोनाचे निश्चितपणे उच्चाटन होऊ शकते. ग्रामपंचायतच्यावतीने कलावंतांना आभाराचे पत्र उपसरपंच नंदकुमार कर्पे यांनी दिले. प्रकाश धडस, बापूराव चंदनशिवे, दयानंद कर्पे, प्रकाश कर्पे व ग्रामस्थ उपस्थित होते.