अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जागर फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जत नगरपरिषदेचे सभापती तथा दलित पॅथरचे जिल्हा उपाध्यक्ष भुपेंद्र कांबळे यांनी काढले.
जागर फाऊंडेशनच्या वतीने शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता अभियानास सुरवात करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती परशुराम मोरे,जत नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टीमु एडके, जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील,माजी पं.स.सदस्य सुभाष गोबी,बाळासाहेब हुच्चाळकर,वाघमारे,श्रीमंत साळे, दुर्योधन कोडग,युवक नेते योगेश बाबा मोटे,पोलीस नाईक कणसे,बाळू कांबळे,आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुपेंद्र कांबळे म्हणाले,जागर फाऊंडेशने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.आपली गल्ली,आपले शहर स्वछ राखणे सर्वाचीच जबाबदारी असून परशुराम मोरे व त्यांच्या टीमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले.
यावेळी बोलताना माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांनी जागर फाऊंडेशनला जत नगरपरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तर जि. प. सदस्य सरदार पाटील बोलताना म्हणाले,जागर फाऊंडेशने स्वच्छता अभियान हाती घेऊन एक स्तुत्य उपक्रम शहरात राबवित आहे.पक्षपात न पाहता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद