अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील उटगी येथील कळ्ळीवस्तीवर राहणाऱ्या रेवाप्पा रायप्पा मेटगार यांच्या राहत्या पत्रावजा घराला बुधवारी आग लागली होती. आगीत कुटूंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच उमदी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांच्यावतीने भांडी व संसाउपयोगी साहित्य देण्यात आले. बिराजदार यांच्यावतीने सुनील बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी (उमदी) येथील शाखेचे सुनिल सातपुते, रविराज होनमुखे,दादा कोळी, आण्णा सातपुते, श्रीशैल बिराजदार आदी कार्यकर्त्यांनी संसारोपयोगी साहित्य दिले.
जत तालुक्यातील उटगी येथील कळ्ळीवस्ती येथे रेवप्पा रायप्या मेटगार यांच्या राहत्या पत्रावजा छप्पराच्या घरास आग लागून संसारोपयोगी साहित्य
सह मोठे नुकसान झाले. रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या मालकीच्या घरास बुधवारी दुपारी तीन वाजता आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.शेजारच्या नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण यश आले नाही.
आगीमुळे घरातील संसारोपयोगी साहित्य ,अन्यधान्य
एक तोळा सोने, रोख रक्कम असे दीड लाखाचे नुकसान झाले. पैशासह दीड लाखाचे नुकसान
झाले आहे घटनेची माहिती मिळताच गावकाम
गावकाम तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात
आला मजुरीचे काम करणाऱ्या मेटगार कुटुंबियांचे राहत्या घराला आगीने गिळंकृत केल्याने कुटुंबीय
रस्त्यावर आले होते. त्यामुळे बिराजदार यांनी तातडीने भेट घेऊन मदत दिली.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद