‘संत निरंकारी मिशन’ रक्तदान शिबीरात २०० भक्तांचे रक्तदान

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

संत निरंकारी मिशनच्या वतीने जत येथे आयोजित रक्तदान शिबीरात २०० निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एस आर व्ही एम हायस्कुल जत येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले.
        या रक्तदान शिबीराचे उद्घाटन  मार्केट कमीटीचे माजी  सभापती प्रकाश जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक गिरमल कांबळे,पापा कुभांर, संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रिय संचालक तसेच मंडळाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश जमदाडे म्हणाले,आज संपुर्ण देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे.निरंकारी मंडळ हे शिबीर आयोजित करुन रक्तदान जीवनदान या घोषवाक्याप्रमाणे जीवनदानाचे काम करीत आहे. मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.मंडळाचे सदस्य निस्वार्थी भावणेने सेवा करतात.संपुर्ण मानवजातीला या मिशनच्या शिकवणीची गरज आहे.त्यांनी मिशनच्या कार्याला शुभेच्छा  दिल्या.रक्तसंकलन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांनी केले.
यावेळी डॉ.शेंडे म्हणाले, रक्तसंकलनामध्ये मंडळाचा जगामध्ये मोठा वाटा आहे.  दरवर्षी फक्त सांगली जिल्हातुन २ ते २.५ हजार रक्तदान मंडळाच्या वतीने होते.मंडळ मानव सेवेमध्ये अग्रेसर आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यानी शिबीरास भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास एस एस आर व्ही एम्.हायस्कूलचे प्राचार्य भोसले व शिक्षक स्टाफ याचे मोलाचे सहकार्य लाभले.
मंडळाचे स्थानिक मुखी आणि सेवादल संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल स्वयंसेवक आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.