गोरडवाडीच्या ‘त्या’ ‘शांततादूतां’चा खाकीकडून ‘गुलाबी’ सत्कार!

बिनविरोध सदस्यांचा सन्मान;”चांगल्या कामासाठी २४ तासात कधी ही फोन करा”: पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकमध्ये
गोरडवाडी ग्रामपंचायतीचे ११ सदस्य बिनविरोध निवड झाल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने गोरडवाडी गावची निवडणूक शांततेत तसेच बिनविरोध पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्यावतीने नूतन ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान करण्यात आला .
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होणार की नाही याची चर्चा जोर धरत असतानाच अखेर गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होऊन माळशिरस तालुक्यात नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे .यामध्ये युवा पिढीचे मोठे योगदान यामध्ये महत्त्वाचे आहे. तसेच गोरडवाडीतील सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून समविचारी युवकांनी , एकत्रित येऊन गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प केला .गावातील सर्व जुने जाणते राजकीय नेतेमंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.त्यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली.
पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड बोलताना म्हणाले,गोरडवाडी ग्रामपंचायतीचे ११ सदस्य बिनविरोध निवड झाल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने गोरडवाडी गावची निवडणूक शांततेत तसेच बिनविरोध पार पाडा मी तुमचा सन्मान करण्यासाठी मी तुमच्या गावात येईन असा शब्द दिला होता .त्यामुळे आज मी तुमचे आभार मांनण्यासाठी आलोय, इथून पुढे कोणाला जरी कशाची अडचण आली तर रात्री असो किंवा दिवसा असो चांगल्या कामासाठी २४ तासात कधीही फोन करा.तसेच गावातील विकासही चांगला करा.
पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या वतीने नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान
वार्ड क्र.१ मधून बाळासाहेब गोरड,संदीपान कर्णवर,
वार्ड क्र.२ विष्णू गोरड,दिपक गोरड,हरिभाऊ कोकरे
वार्ड क्र.३ विजय गोरड,शंकर यमगर,नवनाथ केंगार,
वार्ड क्र.४ पांडुरंग पिसे,मच्छिद्र गोरड,मुगाबाई गोरड
या 11 जणांची बिनविरोध निवड झाल्याने माळशिरस तालुक्यात गोरडवाडी गाव हे चर्चेचा विषय बनला आहे.
यावेळी उपस्थित माजी सरपंच भिकाजी गोरड,माजी सरपंच नानासाहेब कर्णवर,माजी सरपंच लक्ष्मण गोरड,माजी सरपंच रामचंद्र गोरड,तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत गोरड,माजी सरपंच भागवत कर्णवर,पोलीस पाटील नानासाहेब यमगर,पोलीस कर्मचारी शिवाजी परांडे,तुळशीराम गायकवाड ,वैभव लेंडवे,गजानन माने,चेअरमन खंडू कळसुले,किसन यमगर,किसान पिसे,अजिनाथ कर्णवर,कल्याण हुलगे,तात्या कोकरे,संघर्ष यात्री दादा हुलगे,सिकंदर शिकलगार,जावेद शिकलगार,ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .