कोसारी ग्रामीण विकास संस्थेत महिला स्नेहसंमेलन संपन्न

सुभाष हाक्के
प्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /कोसारी:

मकर संक्रातीच्या निमित्ताने ग्रामीण विकास संस्था, कोसारी यांच्या वतीने महिला स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी कर्तुत्ववान महिला म्हणून कोसारी येथील दिलशाद मुनिर तांबोळी या महिलेचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. गतवर्षी अश्विनी भोसले यांचा कर्तुत्ववान महिला म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी सन्मान करण्यात आला होता. तीळ-गूळ वाटप व हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला.
मुंबई पोलीस नवनाथ कदम उपस्थित होते. ते म्हणाले, अजूनही ग्रामीण भागात स्त्रिया असमानातेमुळे समाजात वावरायला घाबरतात. स्त्रियांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रामध्ये समोर आले पाहिजे. स्त्री ही दोन्ही घरात प्रकाश टाकणारी शक्ती असल्यामुळे आजचा समाज घडण्यासाठी स्त्रिचा मोठा वाटा आहे. जागतिक पातळीवर अनेक स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वातुन सामर्थ्य दाखवुन दिले आहे. कलीयुगातील स्त्रियांनी माँ जिजाऊ , सावित्रीबाई फुले, माता अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई यांना खऱ्या अर्थाने समजून घेतले तर आजची स्त्री कोठेच कमी पडणार नाही. संस्थेच्या कार्यवाही समितीच्या अध्यक्षा विमल साळे व मंगल भोसले यांच्यासह अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बाळू कुंभार, किसन थोरात व सागर गुजले, संचालिका मनीषा काळे व शीला थोरात व गावातील 70 महिला उपस्थित होत्या. विश्वास खटके यांनी आभार मानले.यासाठी कोरो इंडिया मुंबई व इकोनेट पुणे यांनी मार्गदर्शन केले होते.