आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेकडून स्वच्छ व नियमित पाणी पुरवठ्यासाठी मदत

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

करगणी व परिसरातील लोकांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्था नेहमीच शेटफळे नळपाणी संस्थेस साहाय्य करीत असते. सध्या लोकांना साथीच्या रोगांपासून संरक्षित करण्यासाठी व त्यांची रोग प्रतिकारकशक्ती अबाधीत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, मुबलक पाणी मिळावे म्हणून आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्था प्रयत्न करीत आहे.
याचाच एक भाग म्हणून संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी नवाज जमादार, उमाजी चव्हाण, मिलिंद मंडले, महेश सरगर, प्रकाश मंडले, सुनील बंडगर, चिकू पांढरे, विनोद साठे, दत्त्ता सरगर, दत्ता पुकळे या सहकाऱ्यांसोबत बैठक करून शेटफळे नळपाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्वच्छ पाणी पुरवठ्याचे नियोजन केले.
यावेळी शेटफळे नळपाणी संस्थेचे शरद पाटील, वसंतराव गायकवाड, बर्गे, करगणी ग्रा. पं. नेते उत्तम माने, श्रीधर खिलारी, अशोक सावकार, किसान काळे, मुद्दसर इनामदार, बरकत शेख, भारत पाटील , सुरेश लांडगे, तळेवाडीचे नेते लक्ष्मण दाजी सरगर, पात्रेवाडीचे अनिल गायकवाड, काळेवाडीचे बालासाहेब काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.