प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पलूस:
पलूस शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये जनजागृती म्हणून सायकल मोर्चेचे आयोजन शहराध्यक्ष अमित बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पलूस शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करत पलूस तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वंचितचे युवा नेते राजेश गायगवाळे म्हणाले कि केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसवर जिएसटी कर प्रणाली आकारून तात्काळ इंधनाच्या किंमती कमी करून देशातील जनतेला दिलासा द्यावा. तसेच महाराष्ट्राशेजारील गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यात पेट्रोल डिझेल गॅसच्या किंमती स्वस्त आहेत मात्र यांच्या तुलनेत राज्यात महागाई जास्त असल्याने एकप्रकारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेची लूट करत असल्याचा आरोप गायगवाळे यांनी केला.
शिराळ्याचे किरण कांबळे म्हणाले कि याची केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ दखल घेत इंधन स्वस्त करण्यासाठी योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा या आंदोलनांची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल.
स्वागत विनीत कांबळे यांनी केले यावेळी विशाल कुरणे, रोहन धुमाळे, प्रशांत कोळी, डॉ. राजेश साठे, अमोल गायगवाळे, आमिर मुल्ला यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद