अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील आसंगीतुर्क येथे बेकायदेशीर एक लाख ८० हजार रुपयांचा बियर साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करणेसाठी पथक तयार केले होते. त्याअनुषंगाने जत विभागात पेट्रोलींग करीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मिरासाब मुजावर हा आसर्गी गावी आपल्या घराशेजारी बसून बिअरच्या बाटल्या विक्री करत आहे. त्यानुसार पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आसर्गी गावी मिरासाब मुजावर याचे घराशेजारी छापा मारुन बिअर विकणा-या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले. त्याने आपले नाव मिरासाहेब मोदिन मुजावर (वय-२८ रा.आसंगी तुर्क ता. जत) असे सांगितले. त्यावेळी त्याचे कब्जात नॉकआऊट पंच कंपनीच्या ६५० मिलीच्या बिअरचे ६३ बॉक्स किंमत रुपये १ लाख,५१हजार,२०० रूपये व नॉकआऊट पंच कंपनीच्या ३३० मिलीच्या बिअरचे १२ बॉक्स किंमत रुपये २८हजार, ८०० रूपये असा एकूण १लाख, ८० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. तो सविस्तर पंचनाम्याने सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी उमदी पोलीस ठाणे येथे म.दारूबंदी अधिनियम कलम ६५ उ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी मुद्देमाल पुढील तपासाकामी उमदी पोलीस ठाणे येथे रिपोर्ट जमा करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जितेंद्र जाधव,आमसिध्दा खोत,मच्छिंद्र बर्डे,सतिश अलदर,राहुल जाधव,गुदतरार पाथरवट, राजु शिरोळकर,बजंरग शिरतोडे यांनी केली.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या