शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ विटा:
विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आढळून आलेल्या लहान मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन केल्याप्रकरणी विटा पोलीसांच्या कामगिरीला विटेकर नागरिकांनी सलाम केला आहे.
पोलीस हवालदार प्रताप ओंबासे,महिला पोलीस भारती जुमळे,होमगार्ड भरत गायकवाड हे पेट्रोलिंग करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर एक लहान मुलगी बराच वेळ रडत थांबली थांबली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सबेकर व पोलीस मुलीजवळ जाऊन चौकशी करू लागले. पण तिला घराचा पत्ता व माहिती सांगता येईना.मात्र विटा पोलीसांच्या पुढे या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेणे कठीणच ठरले. नातेवाईकांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी चेहरापट्टीच्या माध्यमातून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून माहिती गोळा केली. त्याद्वारे पोलीसांनी पत्ता मिळालेल्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता एक महिला घरातच रडत होती.ते संबंधित पोलीस आधिकारी यांच्या निदर्शनास आले. चौकशी करून विचारले असता त्या महिलेने “सहाब हामारी बेटी गुम हो गई है” असे सांगितले. ती महिला पोलीस ठाण्यात आल्यानंतर ती मुलगी माझीच आहे.त्या मुलीला गळ्याशी धरून रडू लागली.”सहाब आप तो भगवान के रूप हो” असे म्हणून अधिकारी व पोलीसांचे आभार मानले. यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश ईगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ती मुलगी त्या महिलेच्या स्वाधीन करण्यात आली. एक चांगली कामगिरी विटा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सबेकर यांच्यासह हवालदार ओंबासे, महिला पोलीस भारती जुमळे,होमगार्ड भरत गायकवाड यांच्या कामगिरीबद्दल अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद