नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे:
माडगुळे येथे श्री ज्योतिर्लिंग मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोना १९ च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी माडगुळे गावात हनुमान जयंती, रामनवमी व इतर धार्मिक व सार्वजनक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे मोठ्या स्वरूपात न घेता लहान स्वरूपात साजरे करण्यात आले.याप्रमाणे दत्त जयंतीच्या कार्यक्रमास लोकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच मंदिरात गावातील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सुरू होता. दुपारी बारा वाजता दत्तमूर्तीवर फुलांचा वर्षाव करून दत्त जयंती साजरी करण्यात आली,त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद