नववर्षात ‘सरस्वती’च्या पूनमने गोरगरिबांना वाटला खाऊ व साड्या!

शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा :

नवीन वर्षाचे औचित्यपूर्ण साधून विटा शहरातील सरस्वती बहुउद्देशीय संस्थेच्या कु.पूनम दयानंद महापूरे यांनी विटा शहरातील गरीब व गरजूंना नवीन वर्षाच्या निमित्ताने साड्या व खाऊचे महीलांना वाटप केले. आपल्या जीवनातील नवीन वर्षाची सुरवात त्यांचा आर्शिवाद घेऊन केली. प्रत्येकवर्षी या उपक्रमात सहभागी होऊन नववर्षाची सुरुवात करीत असते.