शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:
विट्यातील लेंगरे रोडवरील दत्तनगर येथे दत्त जनसेवा मंडळाच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दत्ताचा जन्मकाळ-दत्त जयंती साजरी करण्यात आली.या वेळी दत्तनगर जनसेवा मंडळाचे अध्यक्ष सुधीर लाटणे म्हणाले, 1982 साली छोटी दत्तांची मुर्ती या ठिकाणी होती.नंतर भाविकांची श्रद्धा वाढली आणि लाटणे परिवारावर श्रद्धा भक्तीमय मध्ये येथील कै.अण्णाभाऊ साठे यांनी दत्तांची मुर्ती अर्पण केली. राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रविण साठे यांच्याहस्ते सर्व भाविकांच्या आणि लाटणे परिवारांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली.यावेळी सर्व भजनी मंडळीही उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद