अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील जत व गुगवाड येथील दोन मटक्या अड्ड्यावर गेल्या आठवड्यात धाड टाकून पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही पुन्हा मटका व जुगार अड्डा जोमाने सुरू असल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तर जत येथील अवैध व्यवसायिक पांढऱ्या कपड्यामध्ये व्यासपीठावर वावरताना दिसत असल्याने हा कारवाईचा फार्स आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
जत तालुक्यातील १२० गावांपैकी वेगवेगळ्या ठिकाणी मटका चालकाला अटक करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर पुन्हा त्या ठिकाणी व गावातील सर्व ठिकाणी अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला गावातील अवैध व्यावसायिक समजले जाणारे पांढरा ड्रेस घालून राजकीय व्यासपीठावर वावरताना दिसत आहेत.त्यामुळे धाड पडलेली कारवाईही पोलिसांची आहे की या व्यावसायिक स्पर्धेतूनच धाड टाकली जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा बिनबोभाट अवैद्य मटका व जुगार अड्डे सुरू झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून नक्की यातून काय साध्य करायचे आहे?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जत तालुका हा कर्नाटक सीमेवरील गावात असल्याने गावात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करून सर्वच अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
मटका व जुगार अड्डा चालतो, जत शहरात पोलिसांनी मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकली.त्याचबरोबर सीमेवर असलेल्या गुगवाड गावात धाड टाकली. एजंटाला अटक करून बुक्की मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दोन दिवसांनी पुन्हा जत शहरात मटका अड्डे जोमात सुरू झाले आहेत. पुन्हा मटका अड्डे सुरू झाल्याने जत पोलिसांनी कारवाई करून काय साध्य केले? असा सवाल व्यक्त होत आहे.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या