माळशिरस येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस येथे महसूल विभागाच्यावतीने ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले.
ग्राहकहिताचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद बडवे यांनी सांगितले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस यांच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहितीपत्रक देण्यात आले.यावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर, प्रांताधिकारी शमा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू ,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, कृषी अधिकारी गजानन ननवरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख ,नामदेव काळे,तालुकाध्यक्ष उपेंद्र केस्कर,सहसचिव संजय हुलगे उपस्थित होते.