जत येथे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मूर्तीस्थापना

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील स्वामी भक्तानी अल्पावधीतच उभारलेले श्री. स्वामी समर्थ मंदिर हे अध्यात्माचे केंद्र व्हावे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री. सागर महाराज बोराटे ( नातेपुते) यांनी व्यक्त केली.
ते येथील राजे शिवाजी महाराज नगर या ठिकाणी नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री.स्वामी समर्थ महाराज, श्री. गणेश व ह.भ.प.श्री. कवलेमहाराज यांच्या मुर्तींवर अभिषेक घालून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली .
स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी मंदिरासाठी स्वत:ची साडेपाच गुंठे जागा दिली आहे. त्यांचे वडील नारायण पवार व बंधू मोहन पवार तसेच ट्रष्टचे उपाध्यक्ष अशोक तेली, श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, सदाशिव जाधव आदिनी चांगल्याप्रकारे सहकार्य केल्यानेच हे सुंदर मंदिर उभे राहिले आहे. या मंदिराची कल्पना येथील स्वामी भक्त इंजिनिअर विश्र्वनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र इंजिनिअर कपिल शिंदे यांची आहे.
या प्रसंगी मोहनराव व्हसमाळे व त्यांच्या सहका-यांनी भजनाचा कार्यक्रम केला .त्यानंतर श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर फुले वाहन्याचा कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार,उपाध्यक्ष अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील,दीपक पाटणकर, सदाशिव (तात्या) जाधव आदिनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार, इंजिनिअर विश्र्वनाथ शिंदे, डाॅ. शालीवाहन पट्टणशेट्टी, इंजिनिअर धैर्यशील चव्हाण, दुय्यम निबंधक अधिकारी सुनिल पाथरूट, उपकोषागार अधिकारी सुतार, सदाशिव जाधव, दिनराज वाघमारे, जयवंत आदाटे, सुनिल एकुंडे, सुधिर (दादा),चव्हाण ,शंकर वाघमोडे,अनिल पवार चव्हाण ,बाळासाहेब चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत बोराडे हे उपस्थित होते.