मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्र या सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या वतीने आटपाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि विधवा महिला विकास प्रतिष्ठान,आटपाडी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा लतादेवी बोराडे यांच्या संस्था कार्यालयामध्ये तालुका कार्यकारणी बैठक तालुका अध्यक्षा वैशाली कांबळे यांनी आयोजित केली. यासाठी सांगली जिल्हाध्यक्ष युवराज मगदूम,जिल्हा कार्यकारिणी सदस्य संग्राम घोरपडे व आकाश पाटील हे सांगलीहून तसेच तालुका अध्यक्ष पदी निवड झालेल्या वैशाली कांबळे व तालुक्यातील सदस्य उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी या संघटनेकडून आपल्या अपेक्षा व प्रत्यक्ष सहभाग,संघटन वाढीसाठी आवश्यक बाबी याबाबत चर्चा केली. यावेळी मार्गदर्शक म्हणून युवराज मगदूम यांनी संघटनेचे महत्त्व ,कार्य व उद्धिष्ट आणि आपली भूमिका या विषयी माहिती दिली.
राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी लातूरमधून ऑनलाईन विडिओ काँफरन्सद्वारे उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.त्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय विभागामध्ये समाजकार्य पदवीधर(msw) चे कोणकोणती पदे असू शकतात, यावर चर्चा केली. याबाबत माहिती घेण्याचे व आटपाडी तालुका कार्यकारिणी करण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले.तालुकध्यक्षा वैशाली कांबळे यांनी आभार मानले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद