आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कामगार सेनेकडून दिलासा -दिनकर पतंगे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

येळवी ता.जत येथील सुनिल गंगाराम लांडगे या युवकाने तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती.ही बातमी समजताच कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे ,कामगार सेना तालुकाप्रमुख सुरेश घोडके ,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरळी ,येळवी गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी आत्महत्या केलेल्या लांडगे कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. सुनील लांडगे यांच्या पत्नीला नोकरी लावण्याचे आश्वासन दिले.
सध्या जत तालुक्यात प्रत्येक महिन्याला एखादीतरी आत्महत्याची घटना घडत आहे. ही बाब गंभीर आहे. यासाठी ज्यांची दुबळी मने झालेली आहेत,अशा व्यक्तीने आत्मपरीक्षण करून स्वतःचे मन खंबीर करणे आवश्यक आहे असे दिनकर पतंगे म्हणाले. जत तालुक्यात जेथे आत्महत्या घडली असेल त्या ठिकाणी पतंगे स्वतः जाऊन चौकशी करतात. आत्महत्याचे कारण योग्य वाटल्यास त्यांना थोडीफार आर्थिक मदत करतात.ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे,अशी प्रतिक्रिया जनतेमध्ये आहे.