संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस येथे यावर्षी जास्त पाऊस झाल्याने बसस्थानक परिसरामध्ये भरपुर प्रमाणात गवत वाढले होते. बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक लक्ष्मण खटके यांनी पांडुरंग तात्या वाघमोडे यांना विनंती केली असता त्यास लागणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.आपलं माळशिरस फौंडेशनतर्फे अनेक उपक्रम राबण्यात येतात.फौंडेशनचे मार्गदर्शक माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी ट्रॅक्टर व मजूर उपलब्ध करून दिले व बसस्थानक स्वच्छ करण्यात आले.त्याबद्दल त्यांचा सन्मान वाहतूक नियंत्रक लक्ष्मण खटके यांनी केला.यावेळी दत्तु बुवा वाघमोडे,बाळु जंगले,विनोद थोरात,विठ्ठल वाघमोडे,रामभाऊ कचरे ,सुमित जानकर ,संतोष टेळे सह उपस्थित होते.



संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद