आय.आय.टी.च्या विद्यार्थ्याचे ओंकार स्वरूपा स्कूलमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अनिल मदने 
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: 

ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज येळवी ता.जत येथे सौरभ गडदे आय.आय.टी.खरगपुर (पश्चिम बंगाल) येथील 4 थ्या वर्षात शिकत असणारे सौरभ गडदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पाल्याला घडवण्यात मोलाचा वाटा असणारे भालचंद्र गडदे(सर),व सौरभ गडदे यांचा सत्कार ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेकडून संस्थेचे सचिव संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिक्षक दत्तात्रय चौगुले, नारायण जगदाळे, वैभव चांदवले, ज्ञानेश्वर शिंदे सहशिक्षिका प्रियांका कदम हे उपस्थित होते.
यावेळी सौरभ गडदे म्हणाले,आय आय टीच्या प्रवेशाचा टक्का वाढत नाही. ती गुणवत्ता नसल्याने त्यासाठी लागणाऱ्या अभ्यासासाठीचे मार्गदर्शन मिळत नाही ही खरी अडचण आहे. अकरावी व बारावी या दोन वर्षात विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आयुष्यात (JEE/NEET/MHT-CET/NIT) ला चांगला स्कोर करू शकतात .अभ्यासाचे योग्य नियोजन करून दररोज चार तास सेल्फ स्टडी करून आपल्याला चांगला स्कोर करता येतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात (JEE/NEET/MHT-CET/NIT) चा चांगला स्कोर करण्यासाठी 11वी व 12वी दोन वर्ष महत्त्वाची आसुन NCERT बुक जीवनात बदल घडवू शकतात. विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपले ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागावे.
यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव सांगताना म्हणाले, आपल्या भागातील विद्यार्थ्यांना स्वता:हून अभ्यास करण्याची सवय नाही. विषयाचे सखोल ज्ञान मिळविण्याचा अभाव आहे हे अनुभवाने लक्षात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यानी स्वंयध्ययनाची सवय लावुण, अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले . स्वंयअध्ययनाचा उपक्रम संस्थेने सुरू करून मुलांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करावी. परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत. परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी वर कशाप्रकारे मात करता येईल, कोणत्या विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करावा, स्वत:ला आलेले अनुभव विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करत मार्गदर्शन केले.