रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदुर बाजार(जि.अमरावती):
स्थानिक गुलाबराव महाराज नगर येथील निवासी क्षेत्रात देवांग यांच्या घरासमोरील गेटसमोर आई व मुलाची गळा चिरडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.परंतु ही हत्या आहे की आत्महत्या? अजूनही संशय तसाच आहे.दोघांच्या हातावर व गळ्यांवर ब्लेडचे वार आढळून आले. घटनास्थळी 2 ब्लेड व मोबाईल मिळाला आहे. दोघांना बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माधुरी गजानन शिंगणापूरे, ऋषी शिंगणापूरे अशी त्याची नावे असून दोघेही ता.आर्णी (यवतमाळ) येथील आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या