‘ओंकार स्वरुपा’तर्फे रक्तदान शिबीर व ‘आयुषमान भारत- गोल्डन कार्ड’ चे वाटप

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्थेतर्फे रक्तदान शिबीर व प्रधानमंत्री जनआरोग्य योजेने अंतर्गत
‘आयुष्यमान भारत – गोल्डन कार्ड ‘ ,रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी,शरीरातील रक्ताचे प्रमाण (H.B तपासणी). त्याचबरोबर रक्तगट तपासणी शिबिर सोमवार दि.१४ रोजी ओंकार स्वरुपा इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनि.काॅलेज येळवी येथे सकाळी ठिक 10:00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था येळवीच्या विद्यमाने रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ज्या पद्धतीने रक्त संकलित होते त्या प्रमाणावर ते वापरलेही जाते. रक्ताचा वापर शस्त्रक्रिया, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण, थॅलेसेमिया बाधित रुग्ण, त्यानंतर काही नैसर्गिक आपत्ती, मोठ्या दुर्घटना – अपघात यावेळी रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात लागत असते. तसेच काही शस्त्रक्रिया असतात, त्यावेळी अचानपकपणे रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्ताची मोठी मागणी निर्माण होत असते. अनेक वैद्यकीय उपचारात परिस्थितीनुसार रक्ताची गरज भासत असते.कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई रक्तदानाचा तुटवडा भासू लागला आहे. कोरोना काळात राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी ओंकार स्वरूपा फाउंडेशन संस्थेकडून कोरोनाविषयक काळजी घेऊन रक्तदान शिबीरांचे आयोजन करत आहोत . स्वैच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. भविष्यात लागणाऱ्या रक्ताची गरज ओळखून रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष दीपक (आण्णा) अंकलगी व संस्थेचे सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी केलेआहे.
सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम यशस्वी करणा-या ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था येळवी ता.जत च्या वतीने आता सर्व सामान्य नागरीकासाठी आणखी एक अत्यंत महत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजेने अंतर्गत
“आयुष्यमान भारत – गोल्डन कार्ड ” या विशेष कॅम्पचे आयोजन ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेकडुन करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड नागरिकांना काढून देणे कामी नागरिकांच्या सोयीसाठी येत्या सोमवारी दिनांक 14/12/2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ओंकार स्वरुपा इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनि.काॅलेज येळवी येथे “आयुष्यमान भारत – गोल्डन कार्ड” या विशेष कॅम्प चे आयोजन ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेकडुन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती व आवाहन, सदर योजनेचा लाभ घ्यावा.शिवाय आपण सर्वांनी आपल्या ओळखीच्या सगळ्यांना ह्याबद्दल कल्पना देऊन “आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड” या शिबीर मधून काढुन घ्यायला सांगावे ही विनंती. आसे आवाहन ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्या वतीने करण्यात आलेआहे .
या योजनेअंतर्गत, प्रत्येक कुटुंबासाठी वर्षाकाठी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा ठेवण्याची योजना आखली गेली आहे, याचा 50 कोटीहून अधिक लोकांना फायदा होईल आणि ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.या योजनेतील लाखांच्या रकमेमध्ये तपासणी, औषधोपचार, इस्पितळात प्रवेश इत्यादी सर्व खर्चाचा समावेश असेल.
त्या अंतर्गत हे पूर्वीचे आजार पी एम जे वाय चा भाग असलेल्या राज्यांमध्ये लोक यापैकी कोणत्याही राज्यात जात आहेत, तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.देशभरातील 13,000 हून अधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. लाभार्थ्यांना एक कार्ड देखील देण्यात येईल .या योजनेत सहभागी लोकांची यादीत खालील वेबसाईटवर आपले नाव तपासु शकता.https://mera.pmjay.gov.in तरी येळवी व येळवी परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
.