संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
ग्रामीण सोलापूर जिल्ह्यात महाआवास अभियान सुरुवात करणेकामी सार्वजनिक बांधकाम , मृद व जलसंधारण , वने , पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
घरकुल योजनेत जिल्हयात सर्वाधिक ३१७९ घरकुले पूर्ण केल्याबद्यल तसेच सर्वाधिक उद्दिष्ट असतानाही सातत्याने समाधानकारक कामगिरी करुन माळशिरस विकास गटात सर्वाधिक घरकुले पूर्ण केल्याने माळशिरसच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. पंचायत समितीच्या सभापती शोभा साठे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम , कृषि व पशुसंवर्धन , महिला व बालकल्याण व समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद सदस्य,सदस्या, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते – पाटील, सदस्य, सरपंच, सर्व पदाधिकारी व अधिकारी ग्रामसेवक व कर्मचारी यांचे प्रयत्नाने सर्वाधिक घरकुले पूर्ण करणेचे उद्दिष्ट साध्य झाले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद