गुड्डापूरमध्ये दि.13 पासून तीन दिवस जमावबंदी आदेश: प्रांताधिकारी प्रंशात आवटे
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री.दानम्मादेवी देवस्थानची दि.13 डिसेंबर ते 16 डिसेंबर अखेर होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.तरीही यात्रा काळात कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांचे जथ्ये गुड्डापूरमध्ये येण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासनाकडून मंदिरापासून पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात प्रंतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 144 कलम अन्वये प्रतिंबधात्मक आदेश लागू करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी दिली.
आवटे म्हणाले,तालुक्यातील गुड्डापूर मोठे धार्मिक स्थळ असल्याने कर्नाटक, महाराष्ट्रातील मोठा भाविकवर्ग यात्रेसाठी येत असतो.मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यात्रा देवस्थान कमिटीकडून यापुर्वीच रद्द केली आहे.तरीही धार्मिक श्रध्दा असल्याने भाविक गुड्डापूरमध्ये मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.त्यापार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी ता.13 डिसेंबर रात्री 12 पासून 16 डिसेंबर रात्रीपर्यत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.दानम्मादेवी देवस्थान परिसरातील चारी बाजूच्या पाच किलोमीटर परिसरात 5 किंवा त्यापेक्षा जादा व्यक्तींना एकत्र फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहन आवटे यांनी केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद