विवेक टेंगले यांना समाजसेवा पुरस्कार

सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:

जत तालुक्यातील कोसारी येथील ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले यांना समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
‘सहकार्य हेच जीवन’ हे ध्येय उराशी बाळगून कार्य करत असलेल्या महिला विकास केंद्र उल्हासनगर जि.ठाणे (अंबरनाथ )या संस्थेद्वारे समाजसेवा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी समाजसेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेने सन्मानपञ देऊन ,समाजसेवेचे हे व्रत म्हणून स्वीकारलेल्या आपल्या पुढील समाजकार्यासाठी सुयश व कीर्ती लाभो अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विवेक टेंगले यांचे संपुर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. अशा अनेक छोट्या -मोठ्या पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
यावेळी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती.हिराताई सुरेश कांबळे,सचिव-श्वेता दिपक तांबे,यशवंत सेना अंबरनाथ शहरप्रमुख संतोष टेंगले,ग्रामीण विकास संस्थेचे कार्यवाही सदस्य विनोद भोसले उपस्थित होते.