दिघंची येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

पोपट वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:

दिघंची येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध विहारात व ग्रामपंचायतमध्ये अभिवादन करण्यात आले.बौध्द विहारामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दिघंची पोलीस चौकीचे हवालदार चोरमले व आटपाडी तहसील कार्यालय पुरवठा विभागाचे अधिकारी चिंचाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, अमित वाघमारे, संजय वाघमारे, बाबा वाघमारे, रवि वाघमारे,विजय वाघमारे, महेश वाघमारे,शेखर वाघमारे सुधीर वाघमारे मिलिंद वाघमारे ,बालक वाघमारे ,राहुल चंदनशिवे व समस्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिघंची ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख,उपसरपंच विकास मोरे, ग्रामपंचायत सदस्य जहाॅगिर तांबोळी यांनी प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन केले. तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगविख्यात कार्याची माहिती दिली .यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.अमित वाघमारे, राहुल वाघमारे,कु. प्राची वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.