मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथील वंचित बहुजन आघाडीच्या आटपाडी कार्यालयामध्ये महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
प्रा.डॉ.रामदास नाईक नवरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी मार्केट कमिटी संचालक आनंद ऐवळे, सुखदेव गुळीक, शैलेंद्र आईवळे,आबासो काटे,सिद्धेश्वर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सिनेकलाकार नवनाथ जावीर यांनी आभार मानले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवसाचे अठरा-अठरा तास अभ्यास करण्याची प्रेरणा देणारा महामानव,भगवान गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले या तीन गुरूंच्या वैचारिक मार्गाने घौडदौड करत सामाजिक परिवर्तन घडवणारे क्रांतीसुर्य.. स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुता, मानवता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय अशा लोकशाही बळकट करणार्या परम मूल्यांच्या भक्कम पायावर उभारलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, कायदे व न्यायशास्त्र या विषयात पारंगत असलेले प्रचंड बुद्धिमत्तेचे भारतरत्न…. अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी, यूकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या सारख्या नामवंत विद्यापीठात आपला ठसा उमटविणारे, पीएचडी, डॉक्टर ऑफ सायन्स यासारख्या सर्वोच्च पदव्या मिळविणारे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ञ,प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराथी या नऊ भाषांचे इथंभूत ज्ञान असलेले भाषातज्ञ..Problem of the rupee” and The Annihilation of caste यासारख्या 19 पुस्तकांचे लेखक,मूकनायक या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संपादक, प्रेरणा देणारा एक उत्कृष्ट वक्ता,वर्ण व वर्ग यांच्या उत्पत्तीचे मूळ तळमळीने व मूलभूत अभ्यासाने शोधून जगासमोर मांडणारे अभ्यासू संशोधक, कायद्याची उत्तम जाण असणारे कायदेपंडित,भारताचे पहिले कायदेमंत्री, रंजल्या गांजल्या बांधवांसाठी अंतकरणापासून झटणारे उद्धारकर्ते युगप्रवर्तक,अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे,मनुवादी अन्यायकारक विचारांची होळी करणारे निर्भीड व्यक्तिमत्त्व,शिका , संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश देऊन झोपलेल्यांना जागे करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व,प्रज्ञा, करुणा व शील या गुणांनी ओतप्रोत भरलेले मूर्तिमंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद