अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जागतिक अपंग दिनानिमित्त मौजे सोरडी ता. जत येथे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महेंद्र आणि उपेन्द्र महादेव अवताडे, तसेच अर्चना श्रीकांत व्हनमाने, महादेव रामा दुधाळ या अपंगाचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सोरडी ग्रामपंचायत सदस्य सौ. कुसुमताई तुकाराम भोसले यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांची महाराष्ट्र कामगार सेना महिला आघाडी शाखाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तसेच मारुती भोसले, तुषार भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन मारुती भोसले यांना कामगार सेना सोरडी शाखाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
सोरडी गावचे ग्रामसेवक शिंगे यांनी अपंगासाठी राखून ठेवलेला पाच टक्के निधी म्हणजे साडेपाच हजार रुपये मार्चपर्यंत संबंधित लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके, शाखाप्रमुख मारुती भोसले, मोहनराव गायकवाड, दत्तात्रय शिंदे हे व इतर नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी जागतिक अपंग दिनाचे महत्व समजावून सांगून अपंगानी आपल्या मनामध्ये न्यूनगंड न बाळगता जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर मोठे यश संपादन करावे असे प्रेरणा अपंगाना दिली. तदनंतर उमराणी येथे जाऊन तेथील इराप्पा आवटी, बसू नामद, रियाज अपराध, प्रवीण घारगे, आप्पा तेली, तीपांन्ना कोळी या अपंगांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके, विभाग प्रमुख शिवानंद तिकोंडी, उपविभाग प्रमुख महावीर मढीमनी व इतर नागरिक उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक श्री एस एन वाघमारे यांनी चाळीस अपंगांना निधी वाटप केल्याचे सांगितले. तदनंतर जत येथील विद्युत महावितरण कार्यालयातील श्री लक्ष्मण राठोड या अपंगाचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर तहसील कार्यालय आवारातील रोहिणी भोसले, राजू कांबळे, तमन्ना सरगर या अपंगांचा सत्कार करण्यात आला. तसेच या अपंगांना तहसील कार्यालयाच्या परिक्षेत्रात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी या अपंगाना गाळे उपलब्ध करून देणेबाबत तहसीलदारांना कामगार सेनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. जागतिक अपंगांच्या दिनी अपंग लोकांचा सत्कार करून सन्मानाची वागणूक दिल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद