ज्ञानेश्वर वानखडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /शिराळा(जि.अमरावती): शिराळा ग्राम सचिवालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्या सौ.अलकाताई देशमुख , पंचायत समिती सभापती सौ.संगिताताई तायडे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.शिबिराला डाॅ,करंजेकर, तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले.प्रा.आ.केंन्द्र शिराळाच्या प्रभारी वैद्यकिय अधिकारी डाॅ. मुंन्द्रे व सर्व वैद्यकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी ,शिपाई आणि आशा स्वयंसेविका हजर होते.
शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.नरेंन्द्र खंडारे, आरोग्य पर्यवेक्षक जवंजाळ, राजु झाकर्डे,नारायण माहुलकर ,परिचर रोहणखेडा यांनी रक्तदान केले.आरोग्य सेविका निकिता लोहवे, आरोग्य सहाय्यक उयके, यांनी सहकार्य केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद