प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पंढरपूर:
पंढरपूर येथे यशवंतराव होळकर यांची 245 वी जयंती साजरी करण्यात आली.
मल्हार आर्मीचे तालुकाध्यक्ष नितीन काळे यावेळी बोलताना म्हणाले,ज्या आर्थर वेलसटिने नेपोलियनला रोखलं,टिपूला हरवलं,त्याला यशवंतराव महाराजांच्या पराक्रमामुळे तेथेच सोडून जावं लागलं. अनेक राजा महाराजांनी ब्रिटिशांसमोर गुडघे टेकले असताना यशवंतराव त्यांना देशातून हाकलून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. प्रचंड देशप्रेमी, पराक्रमी,चक्रवती सम्राट छत्रपती यशवंतराव होळकर होते. स्वतःचा राज्याभिषेक करणारे यशवंतराव होळकर इंग्रजांसोबत 18 लढाया लढल्या आणि एकही लढाई हरले नाहीत. ज्यांच्यासमोर इंग्रजांनी सपशेल गुडघे टेकून विनाशर्त तह केला असेही नितीन काळे म्हणाले.
कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल यशवंत सेनेचे राज्य संघटक राजेंद्रकुमार बुध्याळ व काळे यांचा सत्कार समाजसेवक उत्तम बाबा चव्हाण व सर्व समाजाच्या वतीने करण्यात आला. प्रतिमेचे पूजन यशवंत सेनेचे माजी शहराध्यक्ष नगरसेवक भाऊ मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. धनगर समाजाचे नेते माऊली हळवणकर, सुभाष मस्के, अंकुश शंबडे ,रासपचे जिल्हाध्यक्ष पंकज देवकते, अण्णा सलगर, प्रसाद कोळकर, उत्तम बाबा चव्हाण, कोर्टी गावचे युवा नेते संजय माने,अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या दूधभाते मॅडम व समाज बांधव उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद