स्व.राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्थेचे काम कौतुकास्पद : विश्वंभर गोल्डे
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
तरंगफळ येथे स्व.राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्था तरंगफळ यांच्या वतीने ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे जागतिक अपंग दिन हा छोट्याखाणी श्रीनाथ विद्यालयामध्ये घेण्यात आला. मोजक्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही-पेन व खाऊचे वाटप करून जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना वैष्णवीदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या,अपंग बांधवांना सोलापूरला जावे लागत होते.त्यांना अनेक हेलपाटे मारूनसुद्धा त्यांचा प्रश्न सुटत नव्हता. आता मात्र फेर्या माराव्या लागणार नाहीत. कोरोना महामारीचे संकट संपल्यानंतर अकलूजला ऑनलाइन टोकण काढण्याचे काम चालू होईल. तसेच माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य तळागाळातील गोरगरीब नागरीकांना तसेच तालुक्यातील अपंगांना प्रत्येक ग्रामपंचायतमधून तीन 3%टक्के अपंग निधी मजुरांसाठी,बांधकाम नोंदणी, गवंडी कामगार अशांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम मोठे दादा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व उपसभापती अर्जुन दादा मोहितेे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड .शांतीलाल तरंगे यांनी केले. विश्वंभर गोल्डे , वैष्णवीदेवी मोहिते-पाटील सह अनेेेेक मान्यवरांनी व शालेय विद्यार्थ्यांनीही अपंग दिनानिमित्त विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी सरपंच माऊली कांबळे, जगुबाई जानकर ,अॅड . शांतीलाल तरंगे, गोरख जानकर, ग्रामसेवक संतोष पानसरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रा.स.प. बाळासाहेब शिंदे, संतोषकुमार शेंडगे,जयवंत तरंगे ,सुजित तरंगे, दादा जानकर, महादेव तरंगे, सुनील पोरे, भानुदास तरंगे, विठ्ठल जानकर, कुलदीप जानकर, अपंग बांधव, शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद