मारुती घोडके यांचा जतमध्ये सत्कार

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत शहरालगत असलेल्या गावडेवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती घोडके यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जत तालुका सराफ संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील सराफ व्यवसायिक रविंद्र शिंदे यांच्याकडून मारुती घोडके यांना अनवधानाने दहा हजार रुपये जादा आले होते.ही बाब घोडके यांना घरी येऊन पैसे मोजलेनंतर लक्षात आले .त्यांनी रवींद्र शिंदे यांना फोन करून त्याची माहिती दिली. त्यानंतर जादा आलेले दहा हजार रुपये त्यांच्या दुकानात जाऊन परत केले .या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी रवींद्र शिंदे,हनुमंत देवकुळे,सचिन चव्हाण उपस्थित होते.