संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या नव्याने सुरू असलेल्या पक्ष संघटन बांधणी व पक्ष मजबुत करण्यासाठी माळशिरसचे माजी उपनगराध्यक्ष डॉ .आप्पासाहेब देशमुख यांच्याकडे भाजपा ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माळशिरस शहराचे पहिले उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे . विविध क्षेत्रात रक्तदान शिबीर,वृक्ष लागवड , शालेय साहित्याचे वाटप करुन आपल्या कामाचा ठसा उमटवला. यामुळे त्यांच्याकडे पक्षाने राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली आहे. याबरोबरच त्यांना प्रभारी म्हणून सोलापूर शहर व सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.निवडीचे पत्र पुणे येथील एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यांची निवड झाल्याने विविध संघटना व व्यक्तीकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन