जत येथे जागर फाउंडेशन व योगेश मोटे युवा मंचच्यावतीने स्वच्छता अभियान

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

  जत शहरात जागर फाउंडेशन व योगेश मोटे युवा मंचच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानामध्ये जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे,युवा नेते योगेश(बाबा)मोटे ,अभिनंदन साबळे,आनंदा कांबळे, सागर पाथरुट,ओंकार कांबळे, सचिन बागडे,अविनाश साळे,पत्रकार अमोल कुलकर्णी, निलेश माने,भागवत काटकर आदी सहभागी झाले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या उत्साहात व्यापारी लक्ष्मीपूजन करतात.फटाके, सजावटीचे साहित्य यामुळे रस्त्यावर साहजिकच कचरा वाढतो.ऐन सणाच्या कालावधीत हा कचरा तातडीने उचलणे आवश्यक असल्याने एक समाजसेवेचा व स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून कचरा उचलून बाजारपेठ स्वच्छ करण्यात आली.यावेळी नितीन साळे कचरा उचलून भरण्यासाठी मोफत ट्रॅक्टर दिला,तर चहा व्यवसायिक ईलाही कुरुंदवाड यांनी मोफत चहा देऊन स्वच्छता अभियानाला पाठींबा दर्शवला.  यावेळी उपस्थित असलेले मुचंडी गावचे लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील यांनी  मतभेद विसरून पक्षपात न पाहता या स्वच्छता अभियानात नागरिकांनी  सहकार्य करावे.परशुराम मोरे व योगेश मोटे या तरुणांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सरपंच पाटील यांनी काढले.
यावेळी मोरे व मोटे म्हणाले की, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता अभियान राबविले आहे.यापुढील काळातसुद्धा अशाच प्रकारचे सामाजिक कार्य करत राहू यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.