
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
‘जेष्ठ नागरिकाचा सन्मान हा देशाचा अभिमान, प्रत्येक जेष्ठ नागरीक राष्ट्रीय संपत्ती’ या प्रस्तावाची मांडणी, सामाजिक इष्ठता, राजकीय स्वीकारार्हता, आर्थिक व्यवहार्यता तात्काळ अंमलबजावणी करीता अर्थक्रांती राष्ट्रीय साक्षरता मंच व भारतीय जेष्ठ नागरीक महासंघ यांनी सुरू केलेल्या जीवन गौरव अभियानाच्या यशस्वीतेसाठी वाळवा तालुक्यातील अर्थंक्रांती व जेष्ट नागरीक संघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा जीवन गौरव अभियानाचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ मोरे (पाटील) होते.
प्रास्ताविक व स्वागत श्री. गजानन पाटील यांनी केले. अभियानाचा मुख्य उद्देश व हेतू याविषयी श्री नारायण पाटील सर यांनी सखोल मार्गदर्शन केले. या अभियानाचा संपूर्ण आढावा याप्रंसगी अध्यक्ष श्री. जगन्नाथ मोरे (पाटील) यांनी घेतला. याबैठकीत वाळवा तालुका जीवन गौरव कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष, श्री जगन्नाथ मोरे पाटील रेठरे हरणाक्ष, उपाध्यक्ष, श्री. विजयराव लोंढे सरपंच गोटखिंडी, सचिव, श्री रंगनाथ मोहिते महादेववाडी, सहसचिव श्री. चंद्रशेखर मोेरे रेठरे हरणाक्ष, कोषाध्यक्ष, श्री हणमंतराव पाटील बहे, सल्लागार श्री. आनंदराव पाटील साखराळे, सह सल्लागार अॅड्. श्री. किरण पाटील कामेरी, संघटक श्री. नारायण सावंत बिचूद, सह संघटक श्री. दादासाहेब पाटील भंडकिंबे, प्रसिध्दी प्रमुख श्री. अनुप वाडेकर आष्टा, सह प्रसिध्दी प्रमुख श्री. सचिन कांबळे रेठरे हरणाक्ष, जेष्ठ नागरीक मित्र श्री. निवास गायकवाड इस्लामपूर, सदस्य म्हणून श्री. सिताराम कदम केदारवाडी, श्री. रामचंद्र पाटील बावची, श्री. जे. एस पाटील बोरगांव, श्री. शंकर कमाने शिवपूरी, मोहन कुलकर्णी नरसिंगपूर, श्री. पी आर जाधव इस्लामपूर, श्री. ज्ञानदेव सावंत काळमवाडी, श्री. अशोक खराडे तांबवे, सुभाष पाटोळे बेरडमाची यासर्व पदाधिका-यांच्या निवडी संपन्न झाल्या.
याप्रसंगी श्री. अशोक गोडसे वाळवा तालुका फेस्काॅम अध्यक्ष, श्री. आर ए देसाई जिल्हा संघटक व श्री. बी डी खोत तालुका सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार श्री. गजानन पाटील यांनी मानले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद