
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ बदलापूर:
कोरोनाच्या पार्श्वभूीवर महाराष्ट्रातील विविध हॉस्पिटलमधील रक्त तुटवडा लक्षात घेता, मानवता संस्थेच्या ‘गाव तेथे शिबिर’ या उपक्रम अंतर्गत शनिवार दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२० रोजी मु.पो. नारायणगांव, ता.शहापूर, जि.ठाणे येथे पल्लवी रक्तपेढी गोवंडी यांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते, सुमारे २५ रक्तदात्यांनी यावेळी स्वइच्छेने रक्तदान केले.
संपूर्ण शिबिरासाठी रक्तदाते, नारायण गावातील ग्रामस्थ, पल्लवी रक्तपेढी टीम आणि मानवता टीम यांनी प्रचंड मेहनत घेतली. यामुळेच शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रहित प्रथम या तत्वावर जनसेवेसाठी कार्य करणाऱ्या मानवता टीमने लगेचच गरिबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने…एक छोटीसी भेट म्हणून रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२० रोजी शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना मोफत अन्नधान्य, कपडे व दिवाळी फराळ वाटप शिबिराचे आयोजन केलेले आहे. या सोबतच रविवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा भेरे विद्यालय धसई, ता.शहापूर, जि.ठाणे येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद