
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत शहरातील विजापूर-सातारा रोडलगत असलेली अतिक्रमणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेतील अतिक्रमणे हटवून अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे, या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
जत शहरातील मुख्य रस्ता असलेल्या विजापूर-सातारा रोडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खूप त्रास होत आहे.तसेच या अतिक्रमणामुळे अनेक नागरिक वाहन रस्त्यावर पार्किंग करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत आहे.तसेच जत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. या उद्यानाच्या जागेतील व तसेच विजापूर सातारा रोडलगत असलेली जत शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवण्यात यावीत. तसेच सदर अतिक्रमणधारकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्यात यावी व त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, रोडलगत असलेल्या नगरपरिषदेच्या जागेवर दुकान गाळे काढण्यात यावेत व त्यांना व्यवसायासाठी नगरपरिषदेकडून भाड्याने देण्यात यावे
सदर जागेत अतिक्रमण धारक आपापसात अतिक्रमण करून वारंवार भांडणे होत आहेत. काही गाव गुंडाकडून त्या परिसरातील महिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारहाण करणे तसेच घरातील व्यक्तींवर दबाव आणणे असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण धारकांच्यात भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने लक्ष घालून ही अतिक्रमणे काढण्यात यावीत.ही अतिक्रमणे 15 दिवसाच्या आत न काढल्यास अथवा न हटवल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू व त्याचे होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन जबाबदार राहील.
यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे,नंदा संधमित्र सनदी,संध्या गौतम कांबळे,गौतम तुकाराम लोकरे, सखुबाई ऐवळे, सुनिता ऐवळे,वंदना चौगुले,यल्लवा मासाळ, सलमा मणेर,सुमित्रा शिंदे,संगिता हेगडे,अंबिका शिंदे, संभाजी चंदनशिवे, शाराबाई लक्ष्मण कांबळे,जकाप्पा सोमना कांबळे, भास्कर गोरख माने,संतोष ठोकळे,आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद