संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
तरंगफळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अपंगांना रोजगारासाठी स्टॉल उभा करण्यासाठी माळशिरस पंचायत समिती व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील बोलत होते.या कार्यक्रमासाठी माजी उपसभापती किशोर सुळ, बाळासाहेब तावरे, विलास वाघमोडे,अॅड. शांतीलाल तरंगे,सरपंच माऊली कांबळे,रत्नप्रभादेवी अपंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख मारुती जानकर, यांचेसह लाभार्थी कांतीलाल गोपीनाथ मोहिते, पोलीस पाटील जयसिंग साळवे, संभाजी तोरणे, ग्रामस्थ व अपंग बांधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती