
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत शहरातील सातारा रोडलगत असणाऱ्या सुभाष वाघमोडे यांच्या भंगार दुकानांत फिर्यादी तुळजाराम शिंदे (वय 35 रा.उमराणी रोड) हे भंगार घालण्यासाठी गेले असता तुळजाराम शिंदे हे दिव्यांग असल्याने त्याला चिडवण्यात आलं व शिवीगाळ करत भंगार दुकानांमध्ये असलेल्या पाईपने पोटावर,पायावर व पाटीवर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबतची फिर्याद तुळजाराम शिंदे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा संघाचे जत तालुका अध्यक्ष सुभाष वाघमोडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह दिव्यांग व्यक्तीचे अधिनियम 2016 च्या 16 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या