
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
सदाशिवनगर येथील देशी दारू व बियर शॉपी दुकानातून चोरी केलेल्या आरोपीकडून पिस्तूल पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
फिरोज रज्जाक मुलाणी (वय ४४ वर्ष धंदा.मॅनेजर ( टेके दारू दुकान ) रा.ठवरे प्लॉट 1 अकलुज ता.माळशिरस जि.सोलापुर) हे दि. १४/०३/२०१८ रोजी सायंकाळी ०६.४५ वा.यु.बी.टेके यांचे सरकारमान्य देशी दारु व बिअर शॉपी दुकान सदाशिवनगर (ता.माळशिरस) येथे काम करीत होते.त्यावेळी अनोळखी तीन इसमांनी मोटार सायकलवरून येऊन त्यापैकी दोघांनी दुकानात येऊन जबरदस्तीने धमकाउन दमदाटी, शिवीगाळ केली व काउंटरमधील ३१,००० रुपये रोख रक्कम,एक लावा कंपनीचा मोबाईल आणि एक कार्बन कंपनीचा मोबाईल असे चोरलेबाबत फिर्याद दिली होती. माळशिरस पोलीस ठाणेस गु.र.नं.८६/२०१८ भा.द.वि. कलम.३९२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता .
हा गुन्हा दोन वर्षापासुन तपासावर होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा गुन्हा सदाशिवनगर येथील आरोपी गणेश महादेव हाके याने व त्याचे साथीदाराने केल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाली.त्यावरून गणेश हाके यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याने व त्यांचे साथीदार अनिल उर्फ संदीप दिलिप लवटे (वय.२१ वर्ष रा. लवटेवस्ती मेडद ता . माळशिरस) व सम्राट दिलीप खरात (रा.मलवडी ता.माण जि.सातारा)यांचे मदतीने केला असल्याचे सांगितले.
तपासामध्ये गणेश महादेव हाके व त्याचा साथीदार अनिल उर्फ संदीप दिलिप लवटे यांना दि . ९ / १० / २०२० रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी मिळाली. अटक मुदतीत त्यांचेकडे तपास करता गणेश महादेव हाके याने जबरी चोरी करण्यासाठी पिस्तुल बाळगले असल्याचे सांगितले. त्यास कौशल्याने विश्वासात घेवुन विचापुस करता सदर पिस्तुल त्याचे घरात लपवुन ठेवले असल्याबाबत त्याने सांगितले. त्याचेकडुन देशी बनावटीचे दहा हजार रू किमतीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. ही कामगीरी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग निरज राजगुरू,विश्वांबर गोल्डे वरीष्ठ पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक श्री . शशिकांत शेळके , पोना सचिन हेंबाडे , पोकॉ समाधान शेंडगे , पोकॉ सोमनाथ माने , पोना राहुल रूपनवर , पोहेकॉ अमोल बकाल , पोना तुळशिराम गायकवाड , पोकॉ दत्तात्रय खरात , मपोकॉ सुनिता केंगले , मपोकॉ तेजश्री शिंदे , मपोकॉ माधुरी क्षिरसागर यांनी केली आहे .

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या