
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:
हिंदू शेगर समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित ऑनलाईन शेगर वधू वर परिचय मेळाव्याचे उदघाटन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदू शेगर धनगर महासंघाचे अध्यक्ष सुनिल तात्या भगत होते.
आजच्या आधुनिक युगात समाजातील एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून कुटुंब विभक्त होत चालली आहे. समाजाची शैक्षणिक व सामाजिक प्रगती सुधारत असली तरी मात्र सामाजिक एकोपा व स्नेहभाव कमी होत आहे.त्यातूनच विवाह जुळणीसाठी अनेक समस्या निर्माण होत आहे.समाजात इच्छुक वधू वरांना योग्य अनुरूप जोडीदार मिळावा,यासाठी या वधू वर सुचक मंडळाने “झुम अॅपवर” आॅनलाईन मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यातील जवळपास २१० वधू वरांनी सहभाग नोंदविला.कोरोना काळात जमावबंदी आदेश असल्याने ऑनलाईन परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यामुळे आजच्या धावपळीच्या युगात दैनंदिन जीवनातील वेळ व पैसा याची बचत होवून घरबसल्या सुरक्षित ठिकाणी राहून मेळाव्यात सहभाग घेता आला. याचा आनंद सर्व समाजातील कुटुंबांना मिळाला.यावेळी जि प सदस्या श्रीमती सुनीताताई गावडे व घोडगंगा साखर कारखाना संचालक राजेंद्र गावडे, भास्कर पिंगट पोलीस उपअधिक्षक ठाणे, कैलास गावडे पोलीस उपअधिक्षक चाळीसगाव, रामदास वाकोडे पोलीस निरीक्षक बुलढाणा, योगेश लंगुटे पोलीस निरिक्षक बारामती, शिवलाल गावडे, आबासाहेब येडे, संजय खोमणे बीड, बापूसो गाढवे हवेली इ. मान्यवर उपस्थित राहून मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रामदास येडे पाटील (इंदापूर), प्रा.अजय गाढवे (हवेली), संभाजी साबळे सर (शिरूर), सतीश शिंगाडे सर (परांडा), सचिन चवरे(इंदापूर) , तेजराव बिबे (बुलढाणा), रामदास बिबे (कर्जत) व प्रदीप वायसे (उस्मानाबाद) यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास येडे पाटील, वर वधू यांची मुलाखत प्रा.अजय गाढवे व संभाजी साबळे यांनी तर मारूती आण्णा सांगळे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद