पंढरपूर येथे यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी साजरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पंढरपूर:
पंढरपूर येथे यशवंतराव होळकर यांची २०९वी पुण्यतिथी धनगर समाजाच्यावतीने साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळवणकर व नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मल्हार आर्मीचे तालुकाध्यक्ष नितीन काळे म्हणाले, शून्यातून विश्व निर्मिती करण्याची,सत्ताधारी बनण्याची प्रेरणा घेणे हेच खरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन ठरेल.इंग्रजांचा धोका सर्वात प्रथम ओळखून त्यांना देशाबाहेर हुसकावून लावण्यासाठी सातत्याने युद्धरत राहिलेले आणि सर्वच लढाया जिंकून जगातील युद्ध इतिहासात अजरामर झालेले एकमेव स्वातंत्र्य योध्दे म्हणजे यशवंतराव होळकर आहेत.
यावेळी यशवंत सेनेचे राज्य संघटक राजेंद्रकुमार बुध्याळ, शेतकरी संघटनेचे माऊली भाऊ हळवणकर, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, धनाजी बनसोडे, पांडुरंग भिंकी,प्रशांत अल्लापुरकर,अभिलाष बुध्याळ, आदि उपस्थित होते.