
अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे नेतृत्वाखाली असलेल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), माजीअध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांचे मार्गदर्शनातून जलनायक श्रीमंत रामराजे नगर, पुसेगाव रोड, वाखरी (ढवळपाटी) येथे फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या “कृषिदेव पेट्रोलियम” हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.या कंपनीच्या पेट्रोल, डिझेल, रिटेल आउटलेटच्या पेट्रोल व डिझेल विक्रीचा शुभारंभ आ.दिपकराव चव्हाण यांचे शुभहस्ते आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), सचिव, प.पु.उपळेकर महाराज देवस्थान ट्रस्ट, फलटण, व्हा.चेअरमन भगवानराव होळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, आरोग्य समिती सभापती सौ.दिपाली निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती कापसे, श्री.अनिल शिरतोडे,श्री.अमरसिंह खानविलकर उपस्थित होते.
बाजार समिती संचालक विनायकराव पाटील, प्रकाशराव भोंगळे, मोहनराव निंबाळकर, परशुराम फरांदे, बाळकृष्ण रणवरे, चांगदेव खरात, समर जाधव तसेच प्रगतशील शेतकरी यांचे पॅनलवरील रामदास कदम, पंचायत समिती माजी सभापती रामभाऊ ढेकळे, भैरवनाथ सोसायटी चेअरमन शिवाजीराव लंगुटे, साईकृपा वे-ब्रीजचे रामचंद्र नाईक निंबाळकर आणि जिंतीचे शरद रणवरे उपस्थित होते.
तसेच जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, स.रा मोहिते, चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे, यश कन्स्ट्रक्शनचे राजीव नाईक निंबाळकर, श्रीराम सर्व्हेअरचे बापू पाटील, गोविंद भोंगळे, ईश्वर जाधव, बुधागी कन्स्ट्रक्शनचे दिलीप पवार, आरोग्य समितीचे सदस्य महेश ढवळे आणि मोहनराव डांगे उपस्थित होते.
मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, मार्केट कमिटी सचिव शंकरराव सोनवलकर, मार्केट कमिटी स्टाफ आणि भागातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
फलटण सातारा रोडवरील पुसेगाव फाटा ते ताथवडा घाटापर्यंत कोणताही पेट्रोल पंप नसलेने पुसेगाव रोडवरील त्या भागातील व वाखरी-ढवळपाटी मार्केट पॉईंटच्या भोवतालची २२ गावाना सदरील पेट्रोल पंपाचा लाभ होणार आहे.
सकाळ उद्योग समूहाच्या ऍग्रोवन मार्टच्या माध्यमातून मार्केट यार्ड तसेच सबयार्ड वाखरी (ढवळपाटी) येथे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व गरजा खते, बियाणे औषधे, पशुवैद्यकीय सल्ला तसेच इतर सर्व बाबी शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत पोहोचवणेत येणार असल्याची माहिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सर्व मंजूर १२ पेट्रोल पंपा बाबत आ.दिपकराव चव्हाण यांनी सविस्तर माहिती घेतली. संस्थेचे उत्पन्न वाढीसाठी श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांनी माईंड अप्लिकेशन करुन शाश्वत पर्याय निवडले आहेत. श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) आणि त्यांचे सहकारी संचालक मंडळ, सचिव शंकरराव सोनवलकर आणि स्टाफ यांनी केलेल्या पाठपुराव्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे