
योगेश(बाबा)मोटे यांच्या प्रयत्नाला यश
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मुख्य शिवाजी पेठेतील रस्ता पुर्णतः खराब झाला.रस्त्यावरून चालनेसुद्धा अवघड बनले आहे.त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा युवा नेते योगेश(बाबा)मोटे यांनी निवेदनाद्वारे दिला होता.या मागणीची दखल घेत संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून घेतल्याने वाहनधारकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
या रस्त्याबाबत युवा नेते योगेश(बाबा) मोटे यांच्यासोबत किरण शिंदे,युवा नेते नितीन सनदी, डॉ.प्रवीण वाघमोडे, सचिन कुकडे,राहुल मालानी, विशाल कांबळे, प्रमोद ऐवळे, श्रीनिवास बुरुटे,अश्विन हुवाळे, बाळासाहेब सावंत,हणमंत शिंदे,अरुण धोडमणी, अनंत कुकडे आदींनी प्रांताधिकारी ,तहसीलदार यांना निवेदन दिले होते.
या रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने युवा नेते योगेश(बाबा)मोटे यांनी आमदार विक्रमदादा सावंत, प्रांताधिकारी, तहसीलदार ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद