धायगुडे कुटुंबीयांना कामगार सेनेने दिला मदतीचा हात : दिनकर पतंगे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

सनमडी येथील परमेश्वर भीमराव धायगुडे यांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन भेट दिली.त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने पुरामध्ये वाहून गेलेल्या परमेश्वर भीमराव धायगुडे यांच्या कुटुंबाची चौकशी केली. त्यांना प्रेमाचा आधार दिला,दिलासा दिला. त्याचबरोबर कामगार सेनेच्या वतीने थोडीफार आर्थिक मदत केली आणि व्यवसायिक क्षेत्रात मदत करण्याचे आश्वासन दिले.त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेना जत तालुका प्रमुख सुरेश घोडके उपस्थित होते.त्याचबरोबर धायगुडे परिवार उपस्थित होता. त्यांचे सांत्वन करण्यात आले. महाराष्ट्र कामगार सेना संकटात सापडलेल्या शेतकरी शेतमजूर विविध क्षेत्रात काम करणारे कामगार यांच्या पाठीशी ठाम उभी राहील असे सांगितले.